इंदौर - मध्य प्रदेशातील इंदौर येथे एक विलक्षण भावनिक आणि अभिमानास्पद क्षण पाहायला मिळाला. येथील शहीच्या पत्नीच्या आपल्या गावातील तरुणांच्या हातावर पाय ठेऊन आपल्या नव्या घरात प्रवेश केला. स्वतंत्रता दिवस रोजी येथील तरुणांनी देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. येथील तरुणांनी शहीद जवानाच्या विधवा पत्नीसाठी नवीन घर बांधून दिले. सन 1992 मध्ये बीएसएफ जवान मोहन सिंह शहीद झाले होते.
बेटमा गावातील तरुणाईने एकत्र येऊन वीरपत्नीला टोलेजंग नवीन घर बांधून दिले. त्यासाठी, या तरुणांनी 11 लाख रुपये जमा केले होते. सध्या, शहिदाचे कुटुंब एका जुन्या आणि पडक्या घरात राहात होते. सरकारची अनास्था येथेही पाहायला मिळाली. सरकारनेही या कुटुंबाकडे आवश्यक तितके लक्ष दिले नाही. त्यामुळे गावातील तरुणांनी एकत्र येत, 'एक चेक एक दस्तखत' अभियान राबवत वीरपत्नीच्या घरासाठी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. या मोहिमेतून तब्बल 11 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर, राखीपौर्णिमा आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व साधत या तरुणांनी नवीन बांधलेल्या घराची चावी वीरपत्नीकडे सुपूर्द केली. विशाल राठी यांच्यासह गावातील तरुणांनी पुढाकार घेत, देशवासीयांना अभिमान वाटेल, असे कार्य केले आहे.
रक्षाबंधन दिनाच्या या भावुक क्षणी सर्वांनाच अत्यानंद झाला होता. तर, शहीद मोहन सिंह यांच्या पत्नीने सर्वच युवकांना राखी बांधली. या शहिदाच्या पत्नीसाठी बांधण्यात आलेल्या घरासाठी 10 रुपयांची रक्कम खर्ची पडली असून 1 लाख रुपये शहीद मोहन सिंह यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ठेवण्यात आल आहेत. लवकरच मोहन सिंह यांचा पुतळा उभारण्यात येईल, असे विशाल राठी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.