ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि.5 - बंगळुरूमध्ये बांधकाम सुरू असलेली सात मजली इमारती कोसळली आहे. बेलेंदूर परिसरातील ही घटना आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.