नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : राममंदिराची मागणी जनआंदोलनामध्ये बदलणारे व मंदिर निर्माणापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते मंदिराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. राममंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेले माजी खा. विनय कटियार यांचे म्हणणे आहे की, १५ सेकंदांच्या लहानशा शुभ मुहूर्तावर होणाºया शिलान्यासात कोणाची काहीही भूमिका राहणार नाही.
राममंदिर व आंदोलनाशी संबंधित अनेक पैलूंवर बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष विनय कटियार यांनी ‘लोकमत’बरोबर केलेली ही विशेष बातचीत-राममंदिर आंदोलनाचा बिगुल वाजवणाºया नेत्यांच्या शिलान्यासामधील आंदोलनाबाबत ते म्हणाले की, यात कोणाची काही भूमिका नाही. हा केवळ २०० ते २५० लोकांचा कार्यक्रम आहे. कोरोनामुळे सर्वांना लांब-लांब बसविण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी १५ सेकंदांच्या शुभ महूर्तावर भूमिपूजन करतील. तथापि, ते ३ तास अयोध्येत राहतील.राममंदिरासाठी आंदोलन उभे करून मोठा संघर्ष करणारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिपूजनातील सहभागाबद्दल कटियार म्हणाले की, यात न्याय-अन्याय यासारखे काहीही नाही. आता मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व जण मिळून ते उभारत आहेत. जे लोक त्यावेळी बरोबर नव्हते, तेही आज बरोबर आहेत.मंदिराचा मुद्दा बनवून भाजपच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या प्रश्नावर तीन वेळा लोकसभा व एक वेळ राज्यसभेत गेलेले कटियार म्हणाले की, भाजपने मंदिराला पाठिंबा दिला; परंतु कधीच मुद्दा बनवला नाही. पक्षाने जाहीरनाम्यात याला स्थान दिले असले तरी मुद्दा कधीच बनवला नाही.भाजपचे माजी राष्टÑीय सरचिटणीस राहिलेले कटियार म्हणाले की, नरेंद्र मोदी वीर पुरुष आहेत. ते अयोध्येत येत आहेत. त्यांच्या कार्यकाळात मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसने काही अपप्रचार चालवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु आता निर्णय झालेला आहे व सर्व काही शांततेत होत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना कटियार म्हणाले की, त्यादिवशी देशभरातून रामनाम लिहिलेल्या विटा घेऊन रामभक्त कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते.मंदिरासाठी दीर्घ आंदोलनच्हिंदू जागरण मंच व बजरंग दलाची स्थापना करून मंदिर आंदोलन व्यापक बनवणारे कटियार हे कारसेवकांवर गोळ्या चालविण्यासाठी तत्कालीन मुलायम सरकारला दोषी मानतात.च्ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी संपूर्ण अयोध्येतील रस्ते रक्तरंजित केले होते.च्१५२८ मध्ये सुरू झालेल्या मंदिरासाठीच्या शेकडो वर्षांच्या संघर्षात तीन लाख लोकांनी बलिदान दिले. मंदिराचा शिलान्यास त्या बलिदांनाना खरी श्रद्धांजली होईल.