ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - बुलंदशहर सामूहिक बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री आझम खान यांना धारेवर धरलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आझम खान यांना 'त्या' वक्तव्यावर माफी मागण्यास सांगितले आहे. आझम खान यांनी बुलंदशहर सामूहिक बलात्कारावर राजकीय वक्तव्य केलं आहे. आझम खान यांनीही या वक्तव्यावर माफी मागण्यास तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला पीडितेला महिन्याभरात केंद्रीय विद्यालयात भरती करा आणि तिचा पूर्ण खर्च उत्तर प्रदेश सरकारकडून वसूल करा, असा आदेश दिला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणांवर मंत्र्यांकडून होणा-या बेजबाबदार वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्ये करू नये, अशी ताकीदही दिली आहे.
बुलंदशहर गँगरेप प्रकरण : आझम खान माफी मागा- SC
By admin | Published: November 17, 2016 5:01 PM