झोपडपीवर चालले बुलडोझर अतिक्रमण जमीनदोस्त : किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेत
By admin | Published: May 27, 2016 7:54 PM
जळगाव: जिल्हा दूध संघासमोर सुरत रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडपीवर शुक्रवारी बुलडोझर चालविण्यात आले. अनेक वर्षापासून असलेले हे अतिक्रमण तगड्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. किरकोळ वाद वगळता अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत राबविण्यात आली. या परिसरात तीनशे झोपड्या वजा घरे होती. अतिक्रमणधारकांचे पिंप्राळा हुडकोत पुनर्वसन करण्यात आले आहे.
जळगाव: जिल्हा दूध संघासमोर सुरत रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडपीवर शुक्रवारी बुलडोझर चालविण्यात आले. अनेक वर्षापासून असलेले हे अतिक्रमण तगड्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. किरकोळ वाद वगळता अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत राबविण्यात आली. या परिसरात तीनशे झोपड्या वजा घरे होती. अतिक्रमणधारकांचे पिंप्राळा हुडकोत पुनर्वसन करण्यात आले आहे.रेल्वे सुरक्षा बलातर्फे ही अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. या अतिक्रमणधारकांना दोन महिन्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तर गुरुवारीही रहिवाशांना लाऊडस्पिकरद्वारे आवाहन करण्यात आले होते.नोटीस फलकावर सूचना लिहिण्यात आल्या होत्या. सहायक पोलीस अधीक्षक, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकुळ सोनोने यांनी या भागात बैठक घेऊन शुक्रवारी हटविण्यात येणार्या अतिक्रमण मोहिमेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.अनेक महिला व पुरुष गहिवरलेसकाळी पावणे नऊ वाजता दोन बुलडोझरद्वारे अतिक्रमण तोडण्यास सुरुवात झाली. रेल्वे गेटच्या दिशेने हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. रात्री सूचना दिल्यामुळे बहुतांश लोकांनी घरातील सामान हलविला होता, तर काही जणांनी सामानच बाहेर काढला नव्हता.लाकडी पार्टेशनचे घरे व पत्रा असल्याने त्यात त्या वस्तुंचे नुक सान झाले. ज्या घरात इतके वर्ष संसार केला ते डोळ्यादेखत जमीनदोस्त होत असल्याने अनेक कुटुंबांना रडू कोसळले. पोलिसांनीही परिस्थिती समजून या लोकांना धीर दिला.अधिकार्यांचा फौजफाटाशुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता भुसावळ विभागाचे मंडळ सुरक्षा आयुक्त सी.एम.मिश्रा, सहायक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक आयुक्त अनिरुध्द चौधरी, सुरेशचंद्र, निरीक्षक गोकुळ सोनोने, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे, एमआयडीसीचे निरीक्षक सुनील कुराडे, रामानंदचे प्रवीण वाडीले, जिल्हा पेठचे निरीक्षक श्याम तरवाडकर, नियंत्रण कक्षाचे गाडे पाटील आदी यांच्यासह सहायक निरीक्षक, महिला उपनिरीक्षक व १२० कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, १२० गॅँगमन, ६ अभियंते आदी बंदोबस्ताला होते.हैदराबाद येथून मागवला फोर्सरेल्वे सुरक्षा बलाने हैदराबाद येथून महिला अधिकारी व कर्मचार्यांचा अतिरिक्त फोर्स मागविला होता, त्याशिवाय भुसावळ ,नाशिक, मनमाड, चाळीसगाव व अकोला येथून कर्मचारी मागविण्यात आले होते. संभाव्य घटना लक्षात घेता सर्वांना संरक्षण जाळ्या व हेल्मेट पुरविण्यात आले होते. यावेळी दोनजेसीबी व पाच ट्रॅक्टरही मागविण्यात आले होते.