नवी दिल्ली : बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. त्यानंतर मुंबई ते अहमदाबादचा प्रवास दोन तासांत पूर्ण होईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसी) रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.बुलेट ट्रेन स्टेशन जुन्या आणि नव्या साबरमती स्टेशनच्या मध्ये होणार आहे. साबरमतीहून बुलेट ट्रेन निघून अहमदाबादेतीलकालूपूरला येईल. मुंबई (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) ते साबरमती हे अंतर फास्ट ट्रेन २.०७ तासांत पूर्ण करेल. सर्व १२ स्टेशनवर थांबणारी रेल्वे हे अंतर २.५८ तासांत पूर्ण करेल.अधिका-यांनी सांगितले की, सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ९ या काळात दर तासाला तीन रेल्वे धावतील. म्हणजेच दर २० मिनिटाला एक रेल्वे धावणार आहे. उर्वरित वेळेत एका तासात दोन रेल्वे धावणार आहेत. बुलेट ट्रेनमध्ये सुरुवातीला प्रवाशांची क्षमता प्रति ट्रेन ७५० एवढी असेल. ही क्षमता वाढवून नंतर ती १२५० प्रवासी करण्यात येईल. यासाठी ३५ बुलेट ट्रेन विकत घेतल्या जाणार आहेत.बुलेट ट्रेनचा अधिकाधिक स्पीड ३५० किमी प्रतितास व सरासरी स्पीड ३२० किमी प्रतितास असेल. अहमदाबाद ते मुंबई रेल्वे प्रवासाला ७ तास लागतात. विमानाने एक तास लागतो. या दोन्ही शहरांतून रोज २० रेल्वे धावतात व १० विमानेही निघतात. आता बुलेट ट्रेनही १५ आॅगस्ट २०२२ पासून धावू लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.रोज एवढे प्रवासी मिळतील?मुंबई व अहमदाबाद येथून रोज ३५ बुलेट ट्रेन निघतील. त्यांची सरासरी प्रवासीक्षमता एक हजार धरल्यास जाणारे ३५ हजार व येणारे ३५ हजार प्रवासी मिळणे आवश्यक आहे. इतके प्रवासी रोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील का, त्यांना तिचे भाडे परवडेल का, हा प्रश्नच आहे
बुलेट ट्रेनच्या रोज होणार ७० फेऱ्या, दर २0 मिनिटांनी एक ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 6:20 AM