भाजपला मिळणाऱ्या देणगीत बम्पर वाढ, गेल्या वर्षात मिळाले 614 कोटी; जाणून घ्या काँग्रेसची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 07:59 PM2023-02-14T19:59:25+5:302023-02-14T20:00:54+5:30

गेल्या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत  देणग्यांच्या स्वरुपात तब्बल 614.6 कोटी रुपये जमा झाले आहेत. सर्वाधिक देणग्या मिळविण्याच्या ...

Bumper increase in donations to BJP, 614 crore received last year; Know the status of Congress | भाजपला मिळणाऱ्या देणगीत बम्पर वाढ, गेल्या वर्षात मिळाले 614 कोटी; जाणून घ्या काँग्रेसची स्थिती

भाजपला मिळणाऱ्या देणगीत बम्पर वाढ, गेल्या वर्षात मिळाले 614 कोटी; जाणून घ्या काँग्रेसची स्थिती

Next

गेल्या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत  देणग्यांच्या स्वरुपात तब्बल 614.6 कोटी रुपये जमा झाले आहेत. सर्वाधिक देणग्या मिळविण्याच्या बाबतीत काँग्रेस भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र या दोन्ही पक्षांच्या देणग्यांतील तफावत फार मोठी आहे. गेल्या वर्षात काँग्रेसला देणग्यांच्या माध्यमाने 95.4 कोटी रुपये मिळाले आहेत.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) मंगळवारी जारी केलेल्या एका अहवालातून हा खुलासा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेली 20,000 रुपयांवरील एकूण देणगी 780.77 कोटी रुपये होती. ही देणगी 7,141 देणग्यांच्या माध्यमातून मिळाली होती.

अहवालानुसार, “भाजपने एकूण 614.626 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे, ही देणगी भाजपला एकूण 4,957 देणग्यांच्या माध्यमाने मिळाली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसला 1,255 देणग्यांच्या माध्यमातून 95.45 कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपने जाहीर केलेली देणगी इंडियन नॅशनल काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (CPI-M), नॅशनल पीपल्स पार्टी (NPEP) आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसने घोषित केलेल्या एकूण देणगीपेक्षा तिप्पटहून अधिक आहे."

महत्वाचे म्हणजे, सलग 16व्या वर्षी बहुजन समाज पार्टीने (बसपा) घोषणा केली की, त्यांना 20,000 रुपयांपेक्षा अधिकची देणगी मिळालेली नाही. अहवालात म्हणण्यात आले आहे की, “आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणग्यांत 187.026 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. हे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच, 2020-21 पेक्षा 31.50% अधिक आहे.” भाजपची देणगी 2020-21 या काळात 477.545 कोटी रुपये होती. ती 2021-22 दरम्यान वाढून 614.626 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यात 28.71 टक्क्यांची बम्पर वृद्धी दिसून आली आहे.

याशिवाय, “आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान काँग्रेसची देणगी 74.524 कोटी रुपये होती. ती वाढून 2021-22 दरम्यान  95.459 कोटी रुपये झाली. अर्थात 28.09 टक्क्यांनी वाढली आहे.

Web Title: Bumper increase in donations to BJP, 614 crore received last year; Know the status of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.