शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

पाकसमर्थक आलमच्या मुसक्या बांधल्या

By admin | Published: April 18, 2015 12:09 AM

शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती मोहंमद सईद सरकारने फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याला शुक्रवारी पहाटे तडकाफडकी गजाआड केले.

मुफ्ती सरकार झुकले : जम्मू-काश्मिरात हिंसक निदर्शने; देशभरात तीव्र रोष; सय्यद शहा गिलानी नजरकैदेतश्रीनगर : फुटीरतावाद्यांनी भारतीय भूमीवर पाकिस्तानी ध्वज हाती नाचवत पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याबद्दल देशभरात तीव्र रोष व्यक्त होत असताना मित्रपक्ष भाजपने आणलेल्या दबावासमोर झुकत शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती मोहंमद सईद सरकारने फुटीरतावादी नेता मसरत आलम भट याला शुक्रवारी पहाटे तडकाफडकी गजाआड केले. दरम्यान, श्रीनगरमध्ये हुरियत कॉन्फरन्सच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली असता पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात डझनावर लोक आणि दोन पोलीस जखमी झाले.बुधवारी पुलवामा जिह्णातील त्राल येथील रॅलीत काही युवकांनी पाकिस्तानी ध्वज हाती धरत पाकिस्तान, गिलानी आणि आलमच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या. स्वत: मसरत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देताना आढळून आला. त्याच्यासह हुुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी याला श्रीनगर येथे घरी नजरकैदेत ठेवण्यात आले होते.प्रक्षोभक कृती केल्याने मसरतविरुद्ध बदगाम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येताच पोलिसांनी अटकेची प्रक्रिया सुरू केली होती. पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याबद्दल विविध राजकीय पक्षांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर गुरुवारी रात्री मसरतला हब्बाकडाल भागातील एका घरी स्थानबद्ध करण्यात आले होते. पहाटे तडकाफडकी अटक करताच शाहीदगंज पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आलमला म्हटले ‘साहेब’नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी शुक्रवारी आणखी एक वाद निर्माण केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्याशी केली तर दुसरीकडे जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी मसरत आलम याला ‘साहेब’असे संबोधले. हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरपंथी गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जाहीर सभेत आलमने पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन पाकिस्तानच्या समर्थनात नारेबाजी केली होती. या देशविरोधी कारवायांबद्दल त्याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेबाबत प्रतिक्रिया देताना दिग्विजयसिंग यांनी त्याचा आदरार्थी उल्लेख केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्आलमच्या अटकेनंतर भाजपने शुक्रवारी श्रेय मिळविण्याचे राजकारण चालविल्याचे स्पष्ट झाले. काश्मीर खोऱ्यात भारतविरोधी कारवायांना मुभा दिली जाणार नाही असे केंद्र सरकार आणि भाजपने स्पष्ट केले होते, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले. भाजपने आणलेल्या दबावामुळेच आलमला अटक झाली काय? यावर ते म्हणाले की, दबावतंत्राबद्दल बोलणार नाही, मी गृहमंत्री राजनाथसिंग यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचा मुद्दा सांगितला.जम्मू-काश्मीर हे राज्य सत्तेच्या बळावर चालवले जाते. जम्मू-काश्मिरात पाकिस्तानी ध्वज फडकणे आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे देणेही नवे नाही. १९४७ पासून ते घडत आहे.- मसरत आलम भटफुटीरतावाद्यांनी पाक ध्वज हाती घेत नारे देणे हा मोठ्या कटाचा भाग असून सईद यांना लाभ पोहोचविण्याचाच त्यामागे हेतू आहे. खोऱ्यात सईद यांची स्वीकारार्हता वाढावी या उद्देशाने अशा घटना घडवून आणल्या जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला.असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते नवांग रिगझिन जोरा यांनी स्पष्ट केले.काय आहे पार्श्वभूमी च्पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे लष्करी जवानांनी गोळीबारात ठार केलेले दोन युवक अतिरेकी नसल्याचा दावा करीत स्थानिक नागरिकांनी निदर्शने केली होती. च्प्रत्यक्षात दोन्ही युवक हिज्बुल मुजाहिदीनचे भूमिगत कार्यकर्ते असल्याचा दावा लष्कराने केला आहे. दुसरीकडे निरपराध युवकांना बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ हुरियत कॉन्फरन्सचा प्रमुख सय्यद अली शाह गिलानी याने रॅली आयोजित केली होती. च्गेल्याच महिन्यात पीडीपी सरकारने आलमची सुटका केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. संसदेतही हा मुद्दा गाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत निवेदन द्यावे लागले होते.गिलानीविरुद्धही गुन्हा पोलिसांनी मसरत आणि गिलानी, बाशीर अहमद भट ऊर्फ पीर सैफुल्ला याच्यासह अनेक विघटनवादी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. त्यांच्यावर हैदरपोरा येथे पाकिस्तानी ध्वज फडकवण्यासह चिथावणीजनक कृत्य केल्याचा आरोप आहे.