Burari Building Collapsed ( Marathi News ) : दोन दिवसापूर्वी दिल्लीतील मुरारी येथे एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली होती. या इमारतीचा पडलेला ढिगारा काढण्याचे काम सुरू होते, आज या ढिगाऱ्याखाली एक कुटुंब अडकल्याचे दिसले. या सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दैव बलवत्तर! म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, या कुटुंबातील सर्वच सदस्यांची तब्येत चांगली आहे. फक्त जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Varanasi Boat Accident: मोठी घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू
दिल्लीतील बुरारी येथे या आठवड्याच्या सुरुवातीला कोसळलेल्या पाच मजली इमारतीच्या ढिगाऱ्यातून पोलिसांनी चार जणांच्या कुटुंबाला जिवंत बाहेर काढले. राजेश (३०), त्याची पत्नी गंगोत्री (२६) आणि त्यांची मुले प्रिन्स (६) आणि हृतिक (३) अशी या पुरूषांची ओळख पटली आहे. याबाबत कुटुंब प्रमुखांनी आपबीती सांगितली. कुटुंबप्रमुखांनी सांगितले की, ते किमान ३० तास ढिगाऱ्यात अडकले होते आणि फक्त ३ टोमॅटो खाल्ल्याने ते वाचले. त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हा संपूर्ण कुटुंब बेशुद्ध होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टोमॅटो सापडले तेच खाऊन दिवस काढला
२९ जानेवारी रोजी रात्री उशिरा केलेल्या बचाव कार्यात संपूर्ण कुटुंबाला इमारतीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने घरात राहिलेले ३ टोमॅटो खाऊन त्यांची भूक भागवली, असंही कुटुंबीय म्हणाले.
त्यांच्या कुटुंबीयांची एएनआयने मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली. राजेश म्हणाले की, सायंकाळी ६.३० च्या सुमारास ते त्यांच्या कुटुंबासाठी जेवण बनवण्यासाठी जात असताना इमारत कोसळली. त्यांनी ढिगारा काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण यात अयशस्वी झालो. घरात उरलेले फक्त ३ टोमॅटो खाऊन आमचे संपूर्ण कुटुंब ३० तासांहून अधिक काळ जीवंत राहिले.
त्यांनी लगेच हार मानली होती आणि आता जे काय होईल ते देवच करेल, असं त्यांनी सांगितले. राजेश यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हा ते सर्व बेशुद्ध होते. ते कधी आणि कसे रुग्णालयात पोहोचले हे आम्हालाही माहित नाही.
ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढले
इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळल्याने कुटुंब ढिगाऱ्यात अडकले होते. पण हा स्लॅब एलपीजी सिलेंडरवर पडला, त्यामुळे राजेश आणि त्याचे कुटुंब ढिगाऱ्याखाली दबण्यापासून वाचले. इमारत कोसळल्यापासून १६ जणांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत २ अल्पवयीन मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला.