नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादवरणाऱ्या दिल्लीतील बुराडी येथील 11 जणांच्या संशयास्पद मृत्यूला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या 11 जणांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण करण्या आले असून, 12 तास चाललेल्या शवविच्छेदनामध्ये 11 पैकी आठ जणांसोबत कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. तर उर्वरीत 3 मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू हा गळफास लागल्याने झाला होता. तर उर्वरितांच्या मृत्यूबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल. दिल्लीतील बुराडी परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतांमध्ये सात महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. दरम्यान, मृत झालेल्या व्यक्तींसोबत कोणतीही मारहाण केली नसल्याचे समोर आले आहे. या कुटुंबातील दहा जणांचे मृतदेह फासाला लटकलेले तर एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह घरातील एका खोलीत सापडला होता.
Burari Deaths : 12 तास चालले पोस्टमॉर्टम, जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 8:55 PM