चेन्नई : हिंदू धर्माचे अनुयायी देव आणि देवस्थान, मंदिराबद्दल खूप आस्था असणारे असतात. देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जाणे हे त्यांना मोठे भाग्याचे वाटते. आज आम्ही तुम्हाला अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत की, जेथे प्रसाद म्हणून लाडू, मिठाई, खडीसाखर नसते, तर ब्राउनीज, सँडविच आणि बर्गर दिले जातात. येथील पडपईतील जय दुर्गा पीठम मंदिरात ब्राउनीज बर्गर, सँडविच आणि चेरी-टॉमेटोचे सॅलड दिले जाते. हा प्रसाद सरकारमान्य (एफएसएसएआय) असतो. त्यावर एक्स्पायरी डेटही असते. येथे केवळ मेनूच आधुनिक बनवलेला नाही, तर मंदिरालाही आधुनिक रूप दिले आहे. मंदिरात ठेवण्यात आलेल्या व्हेंडिंग यंत्रात टोकन टाकून तुम्ही प्रसादाचा डबा घेऊ शकता. या मंदिराची स्थापना करणारे हर्बल आॅन्कॉलॉजिस्ट के. श्रीधर यांनी सांगितले की, ‘हा प्रसाद वितरित करण्यामागील उद्देश हा आहे पवित्र भावनेने व स्वच्छ, पवित्र स्वयंपाकघरात बनवलेला कोणताही प्रदार्थ प्रसादच असतो. या प्रसादामुळे खूप पर्यटक येथे येतात व जवळपासच्या भागातही मंदिराची ख्याती पसरली आहे.’
मंदिरात प्रसाद म्हणून देतात बर्गर, सँडविच
By admin | Published: April 23, 2017 12:40 AM