पंजाबमधील भटिंडा येथे आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. एका खासगी कंपनीची बस नियंत्रण सुटून नाल्यात कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भटिंडा येथील कोटशमीर रोड येथे एक बस पुलावरून जात असताना नाल्यात कोसळली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवले. आता या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. तसेच घटनास्थळावर एनडीआरएफच्या पथकांनीही मदतीसाठी धाव घेतली होती.