छतरपूर येथे दोन बसचा भीषण अपघात, 80 हून अधिक प्रवासी जखमी, 25 जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:24 AM2021-12-19T00:24:20+5:302021-12-19T00:25:36+5:30

घटनेची माहिती मिळताच गुलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना डायल १०० व रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

Bus accident in Madhya pradesh Chhatarpur many passengers injured | छतरपूर येथे दोन बसचा भीषण अपघात, 80 हून अधिक प्रवासी जखमी, 25 जण गंभीर

छतरपूर येथे दोन बसचा भीषण अपघात, 80 हून अधिक प्रवासी जखमी, 25 जण गंभीर

Next


मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात शनिवारी दोन प्रवासी बसची भीषण धडक झाली. या अपघातात 80 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. छतरपूर जिल्ह्यातील गुलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सध्या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बसचा चुराडा -
मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूरहून बडामलहराला जाणारी बस गुलगंज येथे थांबून प्रवासी भरत होती. याच वेळी मागूण भरधाव वेगाणे येणाऱ्या दुसऱ्या बसने तिला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की मागून धडक दिलेल्या बसचा पार चुराडा झाला. तर दुसरी बसही उलटली. घटनेच्या वेळी दोन्ही बसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी उपस्थित होते. या अपघातात 80 प्रवासी जखमी झाले आहेत, तर यातील 20 ते 25 प्रवासी गंभीर आहेत.

जखमी प्रवासी रुग्णालयात -
घटनेची माहिती मिळताच गुलगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जखमींना डायल १०० व रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपआरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. येथून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात नेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे घटना मागून येणाऱ्या बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.

Web Title: Bus accident in Madhya pradesh Chhatarpur many passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.