नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. तब्बल 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात पडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं असून अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (16 फेब्रुवारी) सकाळी मध्य प्रदेशमध्ये हा अपघात झाला. 54 प्रवाशांनी भरलेली बस ही सिद्धी येथील एका खोल कालव्यात कोसळली. बस सिद्धी येथून सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. सात प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे. 54 पैकी अनेक प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.
आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी
आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये रविवारी (14 फेब्रुवारी) सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. कर्नूल जिल्ह्यातील वेलदुर्ती मंडळाजवळील मदारपूर गावात एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने मदतकार्य सुरू आहे.