ऑनलाइन लोकमत
सुपा, दि. ५ - गुजरातमधील नवसारी बस नदीत कोसळून झालेल्या अपघात ३७ प्रवाशांना जलसमाधी मिळाली. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मिऴालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्य परिवहन मंडळाची बस नवसारी येथून उकाईला जात असताना, ही बस पूर्णा नदीच्या पुलावरुन नदीत कोसळून अपघात झाला. यावेळी बसमध्ये ६० प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात ३७ प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पोलीस अधिका-यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस आणि जीवरक्षक दलाचे अधिकारी दाखल झाले असून नदीत पडलेल्या प्रवाशांना वाचविण्याचे काम सुरु आहे. तसेच, जखमी झालेल्यांना उपचांरासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातातील मृत्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.