शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतून परतत हाेते जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 7:26 AM

बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

- सुरेश डुग्गर

श्रीनगर : अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेतून परतणाऱ्या जवानांवर काळाने घाला घातला. काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात इंडाे तिबेट सीमा पाेलीस दलाच्या जवानांना नेणारी बस खाेल दरीत काेसळली. त्यात ७ जवानांचा मृत्यू झाला. तर ३२ जवान जखमी झाले आहेत. या बसमध्ये जम्मू आणि काश्मीर पाेलीस दलाचेही २ जवानांचा समावेश आहे. 

बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सुमारे १०० फूट खाेल दरीत नदीपात्रात काेसळली. एवढ्या उंचीवरून काेसळल्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात दाेन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जवानांची प्राणज्याेत उपचारादरम्यान मालवली. 

राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आदी मान्यवरांनी शाेक संवेदना व्यक्त केल्या.

जवानाने सांगितला घटनाक्रमअपघातातून बचावलेल्या काही जवानांनी घटनेबाबत माहिती दिली. अनंतनाग येथे उपचारासाठी दाखल झालेले हेड काॅन्स्टेबर खेरनार बापू यांनी सांगितले, की मी ४० सहकाऱ्यांसह पाेशपथरी कॅम्प येथून निघालाे हाेताे. फ्रिसलानाजवळ एका वळणावर चालक अचानक ओरडला की ब्रेक लागत नाही, ब्रेक फेल झाला आहे. त्यानंतर काही क्षणात बस दरीत काेसळली. घटनेनंतर काही स्थानिक धावत आले. त्यांनी मदत केली, असे ते म्हणाले. खेरनार यांच्या पायाला जखमी झाली आहे.

मे महिन्यातही झाला असाच अपघात२७ मे राेजी लडाखजवळ असाच अपघात घडला हाेता. श्याेक नदीत जवानांची बस काेसळल्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाला हाेता. सर्व जवान तुरतूक येथे तैनातीसाठी जात हाेते.

८ जण गंभीर८ जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्रीनगर येथे उपचार करण्यात येत आहेत. इतर जखमींवर अनंतनाग येथे उपचार सुरू आहेत. इतरांची प्रकृती स्थिर आहे.     - एस. एल. थाओसेन,     आयटीबीटी महासंचालक  

मृतांची नावे- दुला सिंह (पंजाब)- अभिराज (बिहार)- अमित के (उत्तर प्रदेश)- डी. राज शेखर (आंध्र प्रदेश)- सुभाष बैरवाल (राजस्थान)- दिनेश बाेहरा (उत्तराखंड)- संदीप कुमार (जम्मू)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघात