महाकुंभहून परतत असलेल्या बसला भीषण अपघात, ७ प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:37 IST2025-02-11T11:36:20+5:302025-02-11T11:37:02+5:30
Bus Accident In Madhya Pradesh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. दरम्यान, महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करून माघारी परतत असलेल्या भाविकांच्या बसला मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात झाला आहे.

महाकुंभहून परतत असलेल्या बसला भीषण अपघात, ७ प्रवाशांचा मृत्यू
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. दरम्यान, महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करून माघारी परतत असलेल्या भाविकांच्या बसला मध्य प्रदेशमध्ये मोठा अपघात झाला असून, यात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील सिहोरा येथे या बसला अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस ही प्रयागराज येथून आंध्र प्रदेशकडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र. ३० वर सकाळी ९.१५ च्या सुमारास मोहला बरगीमधील एका कालव्याजवळ हा अपघात झाला. ट्रक आणि ट्रॅव्हलर बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात ७ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं.