शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

हमरस्त्यावरील गावाला हवे बसस्थानक

By admin | Published: February 20, 2016 2:01 AM

सांगोला तालुक्यातील राजकीय व व्यापारीदृष्ट्या मोठे प्रस्थ असलेले गाव म्हणून महुद गावाची ओळख आहे. गावाचे रुपडे बदलण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना इथे उच्च शिक्षणासाठी तालुका, जिल्‘ाच्या ठिकाणी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुविधा निर्माण व्हायला हवी अशी इथल्या तमाम जनतेची मागणी आहे. हमरस्त्यावर असलेल्या गावात बसस्थानक ही निकडीची बाब आहे. गावची प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे सरपंच बाळासाहेब ढाळे यांनी सांगितले.

सांगोला तालुक्यातील राजकीय व व्यापारीदृष्ट्या मोठे प्रस्थ असलेले गाव म्हणून महुद गावाची ओळख आहे. गावाचे रुपडे बदलण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना इथे उच्च शिक्षणासाठी तालुका, जिल्‘ाच्या ठिकाणी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुविधा निर्माण व्हायला हवी अशी इथल्या तमाम जनतेची मागणी आहे. हमरस्त्यावर असलेल्या गावात बसस्थानक ही निकडीची बाब आहे. गावची प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे सरपंच बाळासाहेब ढाळे यांनी सांगितले.
पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, माघी वारीसाठी जाणार्‍या सर्व दिंड्या , पालख्या याच मार्गावरुन जातात. गावाचा तीर्थक्षेत्र आराखड्यात समावेश होऊन भक्तनिवास, पालखीतळ होण्याची गरज आहे. वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरण झाले पाहिजे. गावातील नेतेमंडळी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या या गावाला शासकीय स्तरावरुन पाठबळ मिळाल्यास आदर्श गाव झाल्याशिवाय राहणार नाही.
दृष्टिक्षेपात गाव...
४क्षेत्रफळ : ४६६३.९, बागायत- २३४८.०५ हे., जिरायत ४९७.७८ हे.
४ग्रा. पं. सदस्य : १७
४कुटुंब संख्या : २६२१
४दारिद्र्य रेषेखालील: ८०५
४मागास कुटुंब: ४५२
४शेतकरी कुटुंब: २५८२
४शासकीय नोकरी: ७६०, खासगी- ५५५, व्यावसायिक- ३१०
४वैयक्तिक शौचालये : १३७१,
४सार्व. शौचालये: ६ युनिट
४समाजमंदिर : १६
४मंदिरे: २७
४गावाची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल
४पतसंस्था: ७
४राष्ट्रीयीकृत बँक : १
४प्राथ. आरोग्य केंद्र: १, उपकेंद्र १, पशुचिकित्सालय १
४स्मशानभूमी १
४गाव, वाड्यावस्त्यांसह १८ प्राथमिक शाळा, १७ अंगणवाड्या, ४ माध्यमिक विद्यालये,महाविद्यालय १
विकासासाठी आवश्यक बाबी
४पंढरपूर-मल्हारपेठ व इंदापूर -जत राज्यमार्गावरील बाजारपेठ व रहदारीचे गाव असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची नितांत गरज.
४राष्ट्रीय पेयजल योजनेतून टंचाईग्रस्त वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा योजना राबवणे. बाजारपेठ व उद्योगाच्या दृष्टीने स्टेट बँकेची शाखा आवश्यक
४तीर्थक्षेत्र विकासनिधी मंजूर होणे आवश्यक.
४पाण्याचे स्रोत भक्कम करण्यासाठी गावओढ्यावर सहा सिमेंट बंधार्‍यांची गरज.
४वंचित वाड्यावस्त्यांना सिंगल फेज वीजपुरवठ्याची गरज
४जोडरस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे.
४वाढीव गावठाणात अंतर्गत काँक्रिट रस्ते आणि भूमिगत गटारींची आवश्यकता.
गावाची वैशिष्ट्ये...
४ब्रिटिशकाळापासून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात खंडोबा देवस्थानची मोठी यात्रा. यात खिलार जनावरांचा मोठा बाजार भरतो. यातून मोठी उलाढाल होते.
४पुरातन हेमाडपंथी मंदिरे. यात अंबिका देवीचे जागृत मंदिर आहे.
४स्वच्छतेच्या दृष्टीने प्रभागात दररोज घंटागाडी आपल्या दारी हा उपक्रम राबवला जातो.
४-७० टक्के हागणदारी मुक्त, ९० टक्के अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व ८० टक्के भूमिगत गटार योजना

कोट:फोटो
मोठी लोकसंख्या व बाजारपेठेचे गाव असल्याने स्मार्ट ग्रामच्या माध्यमातून निधी मिळाला तर गावाचा कायापालट होण्यास मदत होईल यासाठी शासनस्तरावरुन पुरेसा निधी मिळणे गरजेचे आहे.
- शंकर मेटकरी, ग्रामविकास अधिकारी
कोट/ फोटो
महुदसारख्या गावाचा सरपंच होण्याचा मान मिळाल्याचे भाग्य समजतो. स्मार्ट ग्राममध्ये आमच्या गावाचा समावेश व्हावा. त्यादृष्टीने आमचीही वाटचाल सुरु आहे. याला शासनाकडूनही पुरेसे बळ मिळावे.
- बाळासाहेब ढाळे, सरपंच
कोट:
राजकारण हा माझा पिंड नाही; मात्र जनमताच्या जोरावर मी सदस्य झालो. उपसरपंच एक जबाबदारी मानून गावचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.
- दिलीप नागणे, उपसरपंच
महुद
ग्रामदैवत: श्री अंबिका व श्री खंडोबा
लोकसंख्या: १४३५०
पुरुष: ७४०४
महिला: ६९४६
पाण्याचा स्रोत: शिरभावी योजनेसह हातपंप व स्थानिक पाणीपुरवठा.