शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

बस अडवून चालकाला मारहाण पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ : एमआयएमच्या तिघांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 12:36 AM

जळगाव: चुकीच्या बसमध्ये बसलेल्या पत्नीला उतरविण्यासाठी आवाज देऊन चालकाने बस न थांबविल्याने मुराद पटेल (रा.खेडी कोरपावली, ता.यावल) या तरुणाने चालक एकनाथ शंकर पाटील (वय ५५) यांना भररस्त्यावर मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता घडला. दरम्यान, याप्रकारामुळे बस जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तेथे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने वाद आणखीनच चिघळला. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने दोघांनी चूक मान्य केल्याने वाद आपसात मिटला.

जळगाव: चुकीच्या बसमध्ये बसलेल्या पत्नीला उतरविण्यासाठी आवाज देऊन चालकाने बस न थांबविल्याने मुराद पटेल (रा.खेडी कोरपावली, ता.यावल) या तरुणाने चालक एकनाथ शंकर पाटील (वय ५५) यांना भररस्त्यावर मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता घडला. दरम्यान, याप्रकारामुळे बस जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तेथे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने वाद आणखीनच चिघळला. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने दोघांनी चूक मान्य केल्याने वाद आपसात मिटला.
मुराद पटेल व त्यांची पत्नी कोरपावली जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले होते. पटेल हे काही मिनिटासाठी बाहेर गेले असता त्याच वेळात यावल बसची घोषणा झाली,मात्र पटेल यांच्या पत्नी त्या बसमध्ये न बसता चुकून ळगाव आगाराच्या जळगाव-भादली (क्र.एम.एच.२० डी.८३३१) बसमध्ये बसल्या. पती येण्याआधीच बस सुरू झाली,त्यांनी चालकाला बस थांबविण्यासाठी आवाज दिला, परंतु तो त्यांच्यापर्यंत पोहचला नाही. बस आगाराच्या बाहेर निघून रस्त्यावर लागली. पत्नीने बसमधूनच पतीला आवाज दिला असता पटेल यांनी रिक्षा करून बसचा पाठलाग केला.
रस्त्यावरच झाला बसला आडवा
रिक्षाने बॅँक ऑफ महाराष्ट्रजवळ बसला ओव्हरटेक केल्यानंतर पटेल बसला आडवा झाला. चालकाने बस थांबविला असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. पटेल याने चालकाला शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली.त्याच वेळी भादलीहून येणार्‍या बसचालकाने हा प्रकार पाहिल्याने त्याने बस थांबवून हा वाद सोडविला. परंतु दोघंही आक्रमक झाल्याने बस जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली.
एमआयएमची वादग्रस्त एण्ट्री
बसचालक व पटेल यांच्यात वाद झाल्याचे समजताच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जिया अहमद अब्दुल करीम बागवान, रेहान जहागीरदार व ऐनुद्दीन शेख यांनी पोलीस स्टेशन गाठत यात चालकाची चूक असल्याचे सांगून गोंधळ घातला. एस.टी.संघटनेच्या पदाधिकार्‍यांनीही धाव घेतली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने वाद आणखीनच वाढला.
प्रवाशांकडून जाणून घेतली माहिती
दरम्यान, पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर यांनी सर्व गर्दी बाहेर काढून बसमधील प्रवाशांकडून हकीकत जाणून घेतली. यात पटेल याने चालकाला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व पटेल यांनी आपसात तडजोड करुन दोघांनी चूक झाल्याचे मान्य करत आमची तक्रार नसल्याचे पोलिसांना लिहून दिले. यावेळी वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला म्हणून एमआयएमचे जिया बागवान, रेहान जहागीरदार यांना कलम१४९चीनेटीसबजावण्यातआली