जळगाव : यावर्षी असलेल्या कमी पाऊस मानाचा परिणाम सर्वच व्यावसायवर होत असल्याचे दिसते़ मोठ्या प्रमाणावर उलाढाल असलेल्या बांधकाम व्यवसायावरही दुष्काळाचे सावट पडले आहे़ सरासरी ५ ते १० टक्क्यांपर्यंच आर्थिक व्यवहार सध्या बाजारपेठेत होत आहेत़ चांगल्या मोक्याच्या जागा, इमारती व प्लॉट्स विक्रीला असूनही त्यांना खरेदीदार मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे पाऊसमानाचा सर्वात जास्त परिणाम या व्यवसायावर होत असल्याचे दिसते़जिवनाश्यक वस्तूंना पर्याय नाही़़़सध्या बाजारपेठेत खाण्यापिण्यासह सर्वच जिवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत़ मात्र त्या घेण्यावाचून नागरिकांना पर्याय नसतो, म्हणून या क्षेत्रांवर होणार्या परिणामाच्या तुलनेत बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम दुष्काळीस्थितीचा होतो़रोजगाराचाही प्रश्नसध्या कृषी क्षेत्रातील कामगार इथे कामाला येत आहे, अजून तरी त्यांना काम मिळत आहे़ मात्र अजून पाऊसमान खराब राहिल्यास मजूरांचा ओघ वाढल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होवू शकतो़सिमेंट व लोखंडाचे भाव उतरुनही ग्राहक नाही़़़तीन महिन्यांपूर्वी असलेल्या सिमंेट व लोंखडाचे किरकोळ विक्रीचे भाव उतरुनही ग्राहकी नसल्याने या व्यवसायात सध्या तरी मंदीचे सावट आहे़ एकुण व्यवसायापैकी सध्या केवळ २५ टक्केच व्यवसाय होत असल्याची माहिती किरकोळ विके्रते व्यापार्यांनी दिली़पाऊस नसल्याने कुणीही पैसा खर्च करण्यास तयार नाही, त्यामुळे शहरातील अनेक बांधकामे संथ गतीने होत आहेत़आंतरराष्ट्रीय गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विटा, रेती व खडीसह इतर बांधकाम साहित्यातील भावात स्थिरता आहे़ मात्र सरकारने नॉन ट्रेड सिमेंट उत्पादनाला बांधकामाची परवानगी नाकारल्याने सिमेंटच्या भावात ८ ते १० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे़ मात्र लोंखडामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कारणामुळे ७ ते ८ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे़ अशी माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली़लोखंड मे २०१५ - ४४ ते ४५ प्रतिकिलोऑगस्ट २०१५ - ३४ ते ३५ प्रतिकिलोसिमेंट मे २०१५ - ३१० ते ३२५ऑगस्ट २०१५ - २७० ते २८०यावर्षी जर दुष्काळ पडला तर, त्याचा परिणाम या व्यवसायावर पढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत राहिल़ कारण मुळातच मागील वर्षी झालेल्या सततच्या नुकसानीने शेती व्यवसाय कोलमडला आहे़ त्यातच आता आणखी यावर्षी दुष्काळ त्यामुळ शेतकर्यांना यामधून सावरण्यास बराच काळ लागेल़ त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी चांगल्या जमीनी विक्री असूनही त्यांना ग्राहक मिळत नसल्याने अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे अनेक साईटवर खुपच जमिनी, घरे व प्लाट्ही विक्रीच्या प्रतिक्षेत पडलेले आहेत़गुंतवणूकीसाठी धाकधूक पर्जन्यमान बिघडल्याने बहूतेक जणांनी खर्चाला कात्री लावली आहे़ शिवाय जमीन, प्लॉट किंवा घरे यासह सोने-चांदीतही गुंतवलेला पैश्याचे चिज होईल की नाही, म्हणून अनेकागुंतवण्यासाठीही त्यांची धाकधूक होत आहे़शहरात जवळपास ३०० च्या दरम्यान तयार घरे विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत़ मागणीच्या तुलनेतच निर्मिती असल्याने फारसा परिणाम जाणवत नाही़ सध्या केवळ गरजवंतच घरांची खरेदी करित असल्याने, या व्यवसायातील गुंतवणूक मात्र ठप्प झालेली आहे़ सिमेंट व लोखंडातील भावावर सरकारच्या काही धोरणांचा व आंतरराष्ट्रीय उद्योगाचा परिणाम काही प्रमाणावर झाला आहे़- श्रीकांत खटोड, बांधकाम व्यावसायिक, जळगाव़गेल्या काही वर्षांपासून शहराचा विकास खुंटला आहे़ औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत़ यासाठी स्थानिक पुढार्यांसह राज्य शासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ त्यातच आता जिल्ाला दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळालेली आहेत़ त्यामुळे जिल्ाचा विकास होण्याची अपेक्षा आहे़- सुरेश चिरमाळे, सिमंेट व लोखंड व्यापारी, जळगाव़
व्यवसायात मंदी : कोट्यावधींची उलाढाल थंडावली, मजूरांच्या पोटाचा प्रश्न बांधकाम व्यवसायावर दुष्काळाचे सावट
By admin | Published: August 25, 2015 12:38 AM