ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष सोमवारी जाणार निवडणूक आयोगाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 06:17 PM2019-02-01T18:17:33+5:302019-02-01T18:38:57+5:30
केंद्रातील मोदी सरकारने आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला.
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला. मोदी सरकार त्यांच्या जवळच्या 15 उद्योगपतींची 3.5 लाख कोटींची कर्जे माफ करते, आणि शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये देऊन अपमान करताय का असा प्रश्न उपस्थित केला.
निवडणूक डोण्यासमोर ठेवून यांन शेतकरी, बेरोजगार दिसतील. पण याचबरोबर देशाच्या सार्वभौम संस्थांवर होणारे हल्ले, राफेल घोटाळ्याचा मुद्दाही आम्ही उठवणार आहोत, असेही राहुल यांनी सांगितले.
Rahul Gandhi: You can waive off Rs 3.5 Lakh Crore loan of 15 people but give only Rs 17 per day to farmers! What else is this, if not an insult? Election will be fought keeping in mind issue of farmers, unemployment & attacks on institutions, it'll also be on the issue of Rafale. pic.twitter.com/eKQgPyzaC0
— ANI (@ANI) February 1, 2019
तसेच इव्हीएमविरोधात सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता निवडणूक आयोगाकडे सर्व विरोधी पक्ष जाणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.
Congress President Rahul Gandhi: On Monday at 5.30 pm we(Opposition leaders) will go to the election commission over EVMs pic.twitter.com/JGTYLAzyUC
— ANI (@ANI) February 1, 2019