नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला. मोदी सरकार त्यांच्या जवळच्या 15 उद्योगपतींची 3.5 लाख कोटींची कर्जे माफ करते, आणि शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये देऊन अपमान करताय का असा प्रश्न उपस्थित केला.
निवडणूक डोण्यासमोर ठेवून यांन शेतकरी, बेरोजगार दिसतील. पण याचबरोबर देशाच्या सार्वभौम संस्थांवर होणारे हल्ले, राफेल घोटाळ्याचा मुद्दाही आम्ही उठवणार आहोत, असेही राहुल यांनी सांगितले.
तसेच इव्हीएमविरोधात सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता निवडणूक आयोगाकडे सर्व विरोधी पक्ष जाणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.