नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी पुढील चार वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीतून सुमारे १ लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच उत्तर प्रदेश ५ वर्षात १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा दावाही मुकेश अंबानी यांनी लखनौ येथे आयोजित 'यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट' मध्ये बोलताना केला आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स ग्रुप राज्यात 5G सेवा, रिटेल आणि नवीन ऊर्जा व्यवसायासह टेलिकॉम नेटवर्कचा विस्तार करेल. तसेच रिलायन्स टेलिकॉम युनिट जिओ डिसेंबर २०२३पर्यंत राज्यभरात 5G सेवा सुरू करेल. जिओ उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहर आणि गाव कव्हर करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत 5Gचे रोल-आउट पूर्ण करेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितले.