नवी दिल्ली : बॉलिवूडमधील अभिनेते रितेश देशमुख यांनी २७ मे रोजी आपल्या टि्वटर अकाऊंटवरून हैदराबाद विमानतळाचे दोन व्हिडिओज् शेअर केले आहेत. यात लाउंजचे इमर्जन्सी एक्झिट डोअर लॉक स्पष्ट दिसत आहे. आत जाण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी केवळ एलिव्हेटरचा पर्याय आहे आणि तेही वीज कट करण्यात आल्याने बंद आहे. (अपघात होण्याची वाट बघितली जात आहे.) सुरतमध्ये अलीकडेच आगीच्या घटनेत २२ मुलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.काही वेळातच हैदराबाद विमानतळाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून उत्तर देत स्पष्ट केले आहे की, असुविधेसाठी आम्हाला खेद आहे. हा एक किरकोळ तांत्रिक बिघाड होता. त्यात तात्काळ दुरुस्ती करण्यात आली. विमानतळावर सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी निश्चिंत राहा. इमर्जन्सीत काचेचे दार तोडले जाऊ शकते. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. अर्थात, हैदराबाद विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, दरवाजा तोडला जाऊ शकतो. हे उत्तर सोशल मीडिया यूजर्सला बहुतेक लक्षात आले नाही. त्यानंतर लोकांनी यावर कमेंट केल्या. एका टिष्ट्वटर युजर्सने म्हटले आहे की, काचेचे दार तोडले जाऊ शकते; पण ते खूप मजबूत आहे. यासाठी सहज उपलब्ध होईल, असा पर्याय हवा.>काय म्हणाले रितेश देशमुख?दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये रितेश देशमुख यांनी म्हटले आहे की, भलेही प्रवाशांचे विमान चुकू शकते; पण सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला नाही. हैदराबाद विमानतळाने याकडे लक्ष द्यावे की, लोकांना बाहेर जाण्याचा दरवाजा लॉक केला जाऊ शकत नाही.
एअरपोर्टवरील गैरसोयींचा रितेशने केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:00 AM