सालेम : खिशात जरा जास्त सुटे पैसे जमले तर लगेच आपण ती नाण्यांच्या किमतीएवढ्या नोटा मिळविण्याचा प्रयत्न करून खिसा ‘हलका’ करतो. मात्र, तामिळनाडूतील सालेम शहरात बुबथी या २९ वर्षाच्या युवकाने २ लाख ६० हजार रुपयांची बाईक विकत घेतली. ही सारी रक्कम त्याने १ रुपयाच्या नाण्यांमध्ये दिली. हे पैसे मोजायला बाईक शोरुमच्या माणसांना १० तास लागले. या युवकाने स्वत:चे युट्यूब चॅनल चालवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बाईकसाठी पैसे साठविले.
...अशी जमवली नाणीबुबथी याने सांगितले की, स्वत:चे युट्यूब चॅनल चालवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मी बाईकसाठी पैसे साठविले. या पैशांतील चलनी नोटांच्या बदल्यात मी मंदिरे, हॉटेल, चहावाल्यांकडून तितक्याच किमतीची १ रुपयांची नाणी घेत असे. मला माझी बाईक आगळ्या पद्धतीने खरेदी करायची होती. म्हणून ही सारी धडपड सुरू होती.
बुबथी एका खासगी कंपनीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याने एका मिनी व्हॅनमधून शोरुममध्ये काही गोण्या आणल्या.