आपल्या पसंतीचा मोबाईल खरेदी करा, पैसे सरकार देणार! निवडणुकीपूर्वी या राज्याचं महिलांना गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:52 AM2023-06-16T10:52:32+5:302023-06-16T10:53:16+5:30
Smartphone : "याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल."
यावर्षी राजस्थानात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमिवर गेहलोत सरकार लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. यातच आता मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यातील महिलांसाठी एक खास योजना आणिली आहे. ही योजना मोबईल संदर्भात आहे. याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल. याअंतर्गत आम्ही महिलांना स्मार्टफोनच्या बदल्यात एक निश्चित रक्कम देऊ, असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री गेहलोत? -
गेहलोत म्हणाले, सरकार एकाच प्रकारचा मोबाईल देऊ शकते. मात्र बाजारात विविध कंपन्यांचे मोबाईल आहेत. यामुळे आम्ही लोकांना पर्याय देऊ की, तुम्ही बाजारात जा आणि तुमच्या आवडीचा मोबाईल घ्या, एक निश्चित रक्कम सरकार देईल.
#WATCH सरकार एक तरह के मोबाइल दे सकती है पर बाजार में कई प्रकार के मोबाइल हैं इसलिए हम लोगों को विकल्प देंगे कि आप जाओ अपनी पसंद का फोन लो, एक निर्धारित राशि सरकार देगी: राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत, भरतपुर(15.06) pic.twitter.com/NhtFtdOjX7
— ANI_HindiNews (@AHindinews) June 16, 2023
तत्पूर्वी, अशोक गेहलोत म्हणाले होते, आम्ही आपल्याला मोफत स्मार्टफोन देऊ. यात आपल्याला 3 वर्षांपर्यंत फ्री इंटरनेट मिळेल. गेहलोत यांनी 2021 च्या बजेटमध्ये राजस्थानातील 1.35 कोटी महिलांना स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही, तर 30 ऑगस्टला रक्षाबंधनापासून टप्प्या टप्प्याने स्मार्टफोन देण्याचेही म्हटले होते.
या योजनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, मोबाइल ही एक अशी गोष्ट आहे, जी आपण बाजरात घेण्यासाठी गेल्यानंतर आपल्या पसंतीने मिळू शकते. जसे की, किती जीबीचा अथवा कोणता मोबाईल खरेदी करायाचा आहे आदी...