शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

सहा टक्के अडतीला खरेदीदारांचा विरोध

By admin | Published: July 19, 2016 11:41 PM

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा किरकोळ व्यापारी किंवा भाजीपाला खरेदीदारांनी आपल्याकडून घेतल्या जाणार्‍या सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्काला विरोध केला. सुमारे दोन तास बाजार समितीमध्ये सौदे किंवा भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार बंद पाडण्यात आले. याचा फटका शेतकर्‍यांना बसला. सोमवारीही सहा टक्के अडतीच्या मुद्द्यावरून अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांच्यात वाद झाला होता.

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा किरकोळ व्यापारी किंवा भाजीपाला खरेदीदारांनी आपल्याकडून घेतल्या जाणार्‍या सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्काला विरोध केला. सुमारे दोन तास बाजार समितीमध्ये सौदे किंवा भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार बंद पाडण्यात आले. याचा फटका शेतकर्‍यांना बसला. सोमवारीही सहा टक्के अडतीच्या मुद्द्यावरून अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांच्यात वाद झाला होता.
मंगळवारी सकाळी सहा वाजताच खरेदीदारांनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून खरेदीबंद आंदोलन सुरू केले. शेतकर्‍यांनाही किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेऊ देत नव्हते. काही खरेदीदारांनी तर फळ व भाजीपाला मार्केड यार्डाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. १०० ते १५० खरेदीदारांनी जोरदार घोषणाबाजी करीत सहा टक्के अडतीला विरोध केला. आम्ही शेतकर्‍यांकडून अडतदारांच्या मध्यस्थिशिवाय किंवा थेट खरेदी करू आणि कुठलेही शुल्क बाजार समिती, अडतदार यांना देणार नाही, अशी भूमिकाही खरेदीदारांनी घेतली. हा वाद चिघळतच होता. याच वेळी बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. खरेदीदारांची समजूत काढली. सहा ऑगस्टपर्यंत अडत किती व कशी घ्यावी याबाबत स्पष्ट आदेश येतील त्यानंतर निर्णय घ्या, अशी समजूत बाजार समितीने काढली. दोन तास गोंधळ झाला. यानंतर शेवटी खरेदीदारांनी भीजापाला खरेदीला सुरुवात केली. यानंतर बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.