शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 5:24 PM

Bye Elections In 47 Assembly Constituencies: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेसोबत १५ राज्यांमधील विधानसभांच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याशिवाय लोकसभेच्या वायनाड आणि नांदेड या दोन जागांसाठीही पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेसोबत १५ राज्यांमधील विधानसभांच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याशिवाय लोकसभेच्या वायनाड आणि नांदेड या दोन जागांसाठीही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसह १४ राज्यांमधील  विधानसभेत्या एकूण ४७ जागांसाठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उत्तराखंडमधील केदारनाथ विधानसभा आणि नांदेड लोकसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सर्व पोटनिवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.  

उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. पैकी सीसामऊ, फुलपूर, करहल, मझवां, कटेहरी, सदर, खैर, कुंदरकी आणि मीरापूर येथीली पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर अयोध्येतील मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.

दरम्यान, ज्या १५ राज्यांमधील विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये आसाममधील ५, बिहारमधील ५, चंडीगडमधील १, गुजरातमधील १, केरळमधील २, मध्य प्रदेशमधील २, मेघालयमधील १, पंजाबमधील ४, राजस्थानमधील ७, सिक्कीममधील २, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील १ आणि पश्चिम बंगालमधील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

याबरोबरच केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यात वायनाडमध्ये १३ नोव्हेंबर रोजी आणि नांदेडमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Uttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगालRajasthanराजस्थान