शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 6:31 PM

Loksabha, Vidhan Sabha By-Polls Result: पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे दोन बालेकिल्ले फोडण्यात भाजपाला यश आले आहे.

पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे दोन बालेकिल्ले फोडण्यात भाजपाला यश आले आहे. आजम खान खासदार झालेला रामपूर आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव खासदार झालेले आझमगढ भाजपाने हिसकावून घेतले आहे. 

भाजपाने बंपर विजय मिळविला आहे. आझमगढमधून भाजपाचे दिनेश लाल निरहुआ जिंकले आहेत. तर रामपूरमधून भाजपाचे घनश्याम लोधी यांनी विजय निश्चित केला आहे. दिनेश लाल यादव निरहुआ  यांनी अखिलेश यादवांचा चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला आहे. २०१९ मध्ये अखिलेश यांनी निरहुआ यांचा अडीज लाख मतांनी पराभव केला होता. बसपाने मुस्लिम उमेदवार उभा करून सपाची मते आपल्याकडे वळविली होती. रामपूरहून घनश्याम लोधी यांनी ४० हजार मतांनी विजय मिळविला आहे. 

पंजाबमध्ये आप सरकारला मोठा धक्का बसला आहे. संगरुर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सिमरणजीत सिंग मान हे जिंकले आहेत. भगवंत मान यांचा हा मतदारसंघ होता. आपचे उमेदवार गुरमील सिंग यांनी अटीतटीची लढत दिली. 

विधानसभांमध्ये भाजपाची बाजीदिल्लीतील राजिंदर नगर पोचनिवडणुकीत आपने ११ हजार मतांनी विजय मिळविला आहे. तर त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री मनिक साहा यांनी बरदोवलीमधून सहा हजार मतांनी विजय मिळविला आहे. साहा यांना मुख्यमंत्री पद कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक जिंकणे गरजेचे होते. त्रिपुरामध्ये चारपैकी तीन जागा भाजपाने जिंकल्या आहेत, एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. तर आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने मोठ्या फरकाने आत्मकुर सीट जिंकली आहे. भाजपाचा 82,888 मतांनी पराभव केला. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPunjabपंजाब