नवी दिल्लीः लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झालेत. त्यापैकी पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असलं, तरी इतर मतदारसंघातील लढतींवरूनही भाजपा आणि काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज बांधला जाणार आहे. स्वाभाविकच, राजकीय जाणकारांचं लक्ष १४ जागांवर आहे.
महाराष्ट्रातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांच्याविरोधात कुणीच उमेदवार न दिल्यानं या मतदारसंघात मतदान झालं नव्हतं. विश्वजीत कदम बिनविरोध विजयी झालेत. ही जागा वगळता, इतर १४ ठिकाणी काय चित्र आहे, यावर एक दृष्टिक्षेप...
लोकसभा पोटनिवडणूक निकाल
कैराना - राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम हसन विजयी. मृगांका सिंह यांचा केला पराभव. काँग्रेस-सपा-बसपा-रालोद एकीने मोदी-शहा-योगी त्रिकुटाला मोठा धक्का.
पालघर - भाजपाचे उमेदवारी राजेंद्र गावित विजयी. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा दुसऱ्या स्थानावर (जाणून घ्या अपडेट्स)
भंडारा-गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस मधुकर कुकडे यांची विजयी घोडदौड कायम, भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर. (जाणून घ्या अपडेट्स)
नागालँड - नागालँड विधानसभेतील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंट आघाडीवर.
विधानसभा पोटनिवडणूक निकाल
नूरपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पार्टी विजयीशाहकोट (पंजाब) - काँग्रेस विजयीजोकीहाट (बिहार) - राष्ट्रीय जनता दल विजयीगोमिया (झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा विजयीसिल्ली (झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा विजयीचेनगन्नूर (केरळ) - माकपा विजयीराजराजेश्वरी नगर (कर्नाटक) - काँग्रेस विजयीअम्पाती (मेघालय) - काँग्रेस विजयीथराली (उत्तराखंड) - भाजपा विजयीमहेशताला (पश्चिम बंगाल) - तृणमूल काँग्रेस विजयी