नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील ७ राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने सात राज्यातील १३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकसाठी १० जुलैला मतदान होणार असून १३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ज्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत, त्या जागांसाठी अधिसूचना १४ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जून असणार आहे. तर २४ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ जून असणार आहे. दरम्यान, १० जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत बिहारमधील एका विधानसभेच्या जागेवर, पश्चिम बंगालमधील ४ जागांसाठी, तामिळनाडूतील १, मध्य प्रदेशातील १, उत्तराखंडमधील २, पंजाबमधील १ आणि हिमाचलमधील ३ जागांसाठी मतदान होणार आहे.
'या' जागांवर होणार पोटनिवडणूक
पश्चिम बंगाल १) माणिकतला२) राणाघाट दक्षिण३) बागडा४) रायगंज
बिहार१) रुपौली
तामिळनाडू१) विक्रावंदी
हिमाचल प्रदेश१) देहरा२) हमीरपुर३) नालागड
उत्तराखंड१) बद्रीनाथ २) मंगलोर पंजाब१) जालंधर पश्चिम
मध्य प्रदेश१) अमरवाडा