नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना खूप काही सहन करावे लागले. हजारो लोकांनी आपत्नांना गमावले, अनेकांना रुग्णालयात बेडही उपलब्ध होऊ शकले नही, औषधी मिळू शकली नाही, अनेकांना ऑक्सीजन अभावी जव गमवावा लागला, अनेक जण आवश्यक वैद्यकीय साहित्यासाठी रस्त्यावर भटकत होते, अशा परिस्थितीत लोकांनी सरकारी व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (C-voter survey how people are satisfied with PM Narendra Modi gov work during coronavirus second wave)
अशातच, सी व्होटर या संस्थेने एक सर्व्हे केला आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना काळात सरकारने केलेल्या कामावर समाधानी आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर 74 टक्के लोकांनी, हो असे उत्तर दिले, म्हणजेच ते समाधानी आहेत. तर 21 टक्के लोक असमाधानी वाटले. यात 5 टक्के लोक असेही होते, जे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. या सर्व्हेत सी-व्होटरने देशातील 40 हजार लोकांची मते जाणली आहेत.
खरे तर, गेल्या तीन महिन्यात, कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू झाली होती आणि सरकारने काम करायला सुरुवात होताच, नाराजी कमी झाली. 15 एप्रिलच्या जवळपास सरकारवर समाधारी असलेल्या लोकांची संख्या 57.7 टक्के होती. यावेळी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवातच होती.
लोकांना कोरोना काळात गरज असताना बेड, ICU, ऑक्सिजन मिळाले? असा प्रश्न सी-व्होटरने विचारला असता, 32 टक्के लोकांनी सहजपणे मिळाले, असे उत्तर दिले. तर 14 टक्के लोकांनी थोडा त्रास झाला असे उत्तर दिले. याच बरोबर 6 टक्के लोकांनी प्रचंड त्रास झाला, तर 9 टक्के लोकांनी म्हटले आहे, की हे मिळाले नाही. तर आवश्यकताच भासली नाही, असे 39 टक्के लोकांचे म्हणणे आहे.
कोरोनाची दुसरी लाट 7 मेरोजी पीकवर होती. तेव्हा केवळ 34.6 टक्के लोक केंद्र सरकारच्या कामावर समाधानी होते. 16 मेपर्यंत असमाधानी लोकांची संख्या अधिक झाली. या काळात केवळ 32.9 टक्के लोकच संतुष्ट होते.