उद्योगपतीची मुलगी, सीए संयमी होणार जैन साध्वी! आजीकडून प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 08:58 AM2023-03-18T08:58:41+5:302023-03-18T09:00:06+5:30
जवळपास १०० वर्षांपासून कपड्यांचा व्यापार करणाऱ्या जैन कुटुंबातील कन्या संयमी हिने संन्यासाचा मार्ग निवडला आहे.
नलखेडा (म.प्र.) : संयमी एका प्रतिष्ठित उद्योगपतीची मुलगी. लहानपणापासूनच आयुष्यात कोणतीही कमतरता नव्हती. ती स्वत: चार्टर्ड अकाउंटंट झाली; पण तिला हे मायेचे जग आवडत नव्हते. शेवटी संयमी तिलगोता जैन हिने संन्यासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, ती आता जैन साध्वी होणार आहे.
२४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट संयमी १८ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात साध्वीची दीक्षा घेणार आहे. जवळपास १०० वर्षांपासून कपड्यांचा व्यापार करणाऱ्या सागरमल जैन कुटुंबातील कन्या संयमी हिने संन्यासाचा मार्ग निवडला आहे. जैन यांना चार मुलगे, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. राजेश- मंजू यांच्या दुसऱ्या मुलीने म्हणजे संयमीने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच जेव्हा तिने साध्वी बनण्याची इच्छा जाहीर केली, तेव्हा कुटुंबीयांना धक्काच बसला; परंतु, नंतर सर्वांनी तिच्या इच्छेला त्यांनी पाठिंबा दिला.
आजीकडून प्रेरणा
संयमी हिच्या कुटुंबातील तिची आजी धार्मिक स्वभावाची आहे. ती धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेते. त्यांच्यामुळेच संयमीच्या मनात धर्ममार्गावर चालण्याची इच्छा जागृत झाली. आचार्य विश्वरत्नसागर सुरी यांच्या हस्ते संयमीला साध्वीची दीक्षा देण्यात येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"