नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) २०१९ लागू केल्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली. या निर्णयावरुन केंद्र सरकारवर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.यावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना फटकारले आहे. शाह यांनी स्पष्ट केले की, CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. 'सीएए कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही. आपल्या देशात भारतीय नागरिकत्व सुनिश्चित करणे हा आमचा सार्वभौम अधिकार आहे, आम्ही त्याच्याशी कधीही तडजोड करणार नाही, असंही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली आहे. नागरिकत्व कायद्यात कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे शाह यांनी आश्वासन दिले. 'सीएएच्या माध्यमातून भाजप नवी व्होट बँक तयार करत आहे' या विरोधकांच्या आरोपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'विरोधकांकडे दुसरे काम नाही, त्यांचा इतिहास असा आहे की, ते जे बोलतात ते करत नाहीत. पीएम मोदींची प्रत्येक हमी पूर्ण आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये राजकीय फायदा आहे, मग आम्ही दहशतवादावर कारवाई करू नये? कलम ३७० हटवणं हेही आमच्या राजकीय फायद्यासाठी होतं असंही ते म्हणाले. आम्ही कलम ३७० हटवू असे १९५० पासून सांगत आहोत, असंही अमित शाह म्हणाले.
PM मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती कोण? सर्व्हेत समोर आलं नाव, जाणून चकित व्हाल!
आश्रय घेणारे आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येईल तो दिवस दूर नाही आणि घुसखोरी थांबवेल. तुम्ही असे राजकारण करत असाल आणि तुष्टीकरणाचे राजकारण करून राष्ट्रीय सुरक्षेच्या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर घुसखोरी केली आणि निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध केला तर जनता तुमच्या पाठीशी राहणार नाही. ममता बॅनर्जी यांना आश्रय घेणारी व्यक्ती आणि घुसखोर यांच्यातील फरक कळत नाही.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका
सीएम अरविंद केजरीवाल यांच्या आरोपवार शाह म्हणाले,'भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला आहे. हे सर्व लोक आधीच भारतात येऊन राहतात हे त्यांना माहीत नाही. त्यांना एवढीच काळजी असेल तर ते बांगलादेशी घुसखोरांबद्दल का बोलत नाहीत किंवा रोहिंग्यांबद्दल का बोलत नाहीत? ते व्होटबँकेचे राजकारण करत आहेत, असंही शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, 'बरेच लोक आहेत, अद्याप कोणतीही गणना झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेकजण अर्ज भरण्यास टाळाटाळ करतील. ज्यांनी येथे अर्ज केला आहे आणि नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवला आहे अशा सर्वांना मी खात्री देऊ इच्छितो की तुम्हाला नागरिकत्व दिले जाईल. हा कायदा तुम्हाला निर्वासित म्हणून स्वीकारत आहे. जर तुम्ही बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला असेल तर तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाला समान अधिकार दिले जातील कारण ते भारताचे नागरिक होतील.