शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

आंदोलनाचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका, पर्यटकांचा ओघ आटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 5:27 AM

पर्यटकांचा ओघ आटणार; अनेक देशांनी भारताला पर्यटनासाठी असुरक्षित देश केले घोषित

कोलकाता : सीएए आणि एनआरसी यावरून देशात निर्माण झालेल्या संघर्षाचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसत आहे. अनेक देशांनी भारताला प्रवासासाठी असुरक्षित देश घोषित केले आहे. त्यामुळे ऐन सुट्यांच्या हंगामात विदेशी पर्यटकांचा ओघ आटण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतीय पर्यटकही देशांतर्गत पर्यटन करण्यापेक्षा विदेशी जाण्याचा पर्याय निवडण्याचा विचार करीत आहेत.

‘बुकिंग केलेल्या विदेशी पर्यटकांकडून आम्हाला परिस्थितीची विचारणा करणारे फोन येत आहेत. बुकिंग रद्द करण्याचे अथवा प्रवास पुढे ढकलण्याचे प्रकार अजून फार मोठ्या प्रमाणात घडलेले नाहीत. तथापि, वातावरण न निवळल्यास बुकिंग रद्दच होऊ शकतात, असे ट्रॅव्हल एंजटस् असोसिएशनच्या अध्यक्ष ज्योती मायल यांनी सांगितले. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि आॅस्ट्रेलिया या देशांनी आपल्या पर्यटकांसाठी सल्लापत्र जारी करून भारतात प्रवास टाळण्याचा व विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.केरळच्या मुख्यमंत्र्यांवर केंद्रीय मंत्र्यांची टीका1 तिरुवनंतपुरम : नागरिकत्व कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनावरून केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि राज्यातील काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांच्यावर टीका करीत केंद्रीय परराष्ट्रमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन रस्त्यांवर घेऊन जाणे हे अराजकवाद्यांचे वैशिष्ट्य आहे.2 केरळात काँग्रेस आणि डाव्यांनी अलीकडेच सीएएविरुद्ध संयुक्त आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वातील रालोआ, संघ परिवारावर टीका केली होती.3 मुरलीधरन म्हणाले की, केरळच्या मुख्यमंत्र्यांना जर या कायद्याबाबत काही शंका असतील, तर त्यांनी यावर चर्चा करावी; पण हे आंदोलन रस्त्यांवर घेऊन जाणे अराजकवाद्यांचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा संवैधानिक पदांवर बसलेले लोक अराजकवादी बनण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कायदा सुव्यवस्थेसाठी त्यांच्याशी कोण संपर्क करील.

टॅग्स :Keralaकेरळcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकtourismपर्यटनBJPभाजपा