श्रीमंत माने, लोकमत न्यूज नेटवर्ककाेलकाता : सुधारित सीएए कायद्यानुसार बंगाली निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळेल, हे भाजपकडून दाखविले जाणारे स्वप्न व तृणमूल काँग्रेसकडून दाखवली जाणारी भीती, या प्रचाराच्या कात्रीत पश्चिम बंगालचे अनेक मतदार अडकले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री निशित प्रामाणिक इथले विद्यमान खासदार. केंद्रात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय नागरिकत्वाबद्दल शंका घेतली गेली, आरोप झाले ते हेच निशित प्रमाणिक. दुसऱ्यांदा नशीब आजमावणाऱ्या प्रमाणिक यांच्यापुढे तृणमूल काँग्रेसचे जगदीश बसुनिया, काँग्रेसच्या प्रिया रॉय चौधरी व फॉरवर्ड ब्लाॅकचे नितीश चंद्र रॉय यांचे आव्हान आहे.
निवडणुकील कळीचे मुद्दे
- एकूण लोकसंख्येच्या ५०.१% म्हणजे निम्म्याहून अधिक लोकसंख्या अनुसूचित जातींची असणारा देशातील एकमेव जिल्हा.
- कूचबिहारमध्ये राजबंशींची संख्या मतुआपेक्षा अधिक काँग्रेसच्या प्रिया रॉय चौधरीवगळता भाजपचे निशित प्रामाणिक, तृणमूलचे जगदीश बसुनिया, फॉरवर्ड ब्लॉकचे नितीश चंद्र राय हे तिघेही राजबंशी.
- राजबंशी अनुसूचित जातीचा सर्वाधिक १८.४ टक्के लोकसंख्येचा समाज, तर १७.४ टक्के मते दुसऱ्या क्रमांकावर.
- २०१९ मध्ये काय घडले?
निशित प्रामाणिक भाजप (विजयी) ७,३१,५९४ परेशचंद्र अधिकारी तृणमूल काॅंग्रेस ६,७७,३६३