शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

'जाणूनबुजून निवडणुकीपूर्वी CAA ची अंमलबजावणी केली', विरोधकांचा केंद्र सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 7:14 PM

केंद्र सरकारने आज नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला.

CAA in india: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आज बहुचर्चित CAA, म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला. विविध कारणांमुळे गेल्या चार वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता आज अखेर त्या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारने CAA ची अधिसूचना जारी केल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. 

जयराम रमेश यांची टीकाCAA अधिसूचना जारी केल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'डिसेंबर 2019 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे नियम अधिसूचित करण्यासाठी मोदी सरकारला चार वर्षे आणि तीन महिने लागले. भाजप सरकार अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आणि वेळेत काम करत असल्याचा पंतप्रधानांचा दावा असतो. पण, CAA चे नियम अधिसूचित करण्यासाठी लागणारा वेळ, हे पंतप्रधानांच्या खोटेपणाचे आणखी एक उदाहरण आहे.'

'नियमांच्या अधिसूचनेसाठी नऊ मुदतवाढ मागितल्यानंतर, सरकारने आता बरोबर लोकसभा निवडणुकीच्या आधी जाणूनबुजून हा कायदा लागू केला आहे. विशेषत: आसाम आणि बंगालमधील मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केले गेले आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बाँड घोटाळ्यावर फटकारल्यानंतर बातम्या मॅनेज करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, 'निवडणुका जवळ आल्या की, वृत्तवाहिन्यांद्वारे माहिती पसरवायला सुरुवात होते. आज रात्रीपर्यंत CAA लागू होईल, असे चॅनेलवाले सांगत आहेत. चार वर्षांत अनेकवेळा मुदतवाढ दिल्यानंतर हा कायदा मंजूर करण्यात आला आणि निवडणुका जाहीर होण्याच्या दोन-तीन दिवस आधी त्याची अंमलबजावणी राजकीय कारणांसाठी केली जात आहे. आता नियम कसे बनवले जातात, याची आम्ही वाट पाहत आहोत. अद्याप आम्हाला माहिती मिळालेली नाही. सर्व नियम पाहिल्यानंतर आणि संपूर्ण अहवाल वाचल्यानंतर त्याबद्दल सविस्तर बोलेन. कोणताही भेदभाव असेल तर तो आम्ही स्वीकारणार नाही.'

'त्यांनी सीएए आणि एनआरसीद्वारे कोणाचेही नागरिकत्व रद्द केले, तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही कोणत्याही किंमतीत एनआरसी स्वीकारणार नाही. आम्ही सीएएचा वापर लोकांना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यासाठी होऊ देणार नाही. भारत आणि बंगालमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक आहे. त्यांना सर्व अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. या नव्या कायद्याने जुने अधिकार हिरावून घेतले जाऊ नयेत. बंगालसोबतच ईशान्येकडील प्रदेशही अत्यंत संवेदनशील आहे. निवडणुकीपूर्वी कोणतीही अशांतता आम्हाला नको आहे,' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

काय आहे CAA ? नागरिकत्व सुधारण कायदा, म्हणजेच CAA अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळाला कंटाळून भारतात आलेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन भारताचे नागरिकत्व घेऊ शकतात. केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे शेजारील देशातील अल्पसंख्याकांना आता भारतीय नागरिकत्व घेता येणार आहे. शेजारील देशांतून येणाऱ्या अल्पसंख्याकांना सरकारने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागेल.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of CitizensएनआरसीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहcongressकाँग्रेस