शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, 37 पोलीस गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 7:07 PM

CAA Protest : भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी.भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनात आज पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली आहे. दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला असून तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. जखमी पोलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार,  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. पेट्रोल पंप आणि काही गाड्या पेटवण्यात  आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरेही पेटवली आहेत. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत. सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला आहे. रविवारी देखील सीएए विरोधी आंदोलनात दगडफेक झाली होती. सीएएच्या निषेधार्थ जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या होत्या. मात्र कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी कबीरनगर मेट्रो स्थानकाजवळ एकमेकांवर दगडफेक सुरू केली, त्यामुळे येथील रस्त्यावर लोकांमध्ये धावपळ झाली. या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दोन्ही बाजूंनी होणारी दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे हवेत उडवले होते. 

दोन मेट्रो स्थानके बंद

सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे दिल्ली मेट्रोने (डीएमआरसी) मौजपूर आणि बाबरपूर मेट्रो स्थानके बंद केली आहेत. जाफराबाद आंदोलनाच्या निषेधार्थ आणि सीएएच्या समर्थनार्थ ते रस्त्यावर उतरलेत. आम्ही दिल्लीत आणखी एक शाहीन बाग उभारू देणार नाही असं भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी म्हटलं होतं. तसेच कपिल मिश्रा यांनी व्हिडिओ ट्विट करुन म्हटलंय की,"दुसरी शाहिन बाग दिल्लीत होऊ देणार नाही. तसेच लोकांना सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. मौजपूर चौकात दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CAA Protest : सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक, हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

China Coronavirus : दक्षिण कोरियात रेड अलर्ट! 'कोरोना'मुळे तब्बल 2,592 जणांचा मृत्यू

Donald Trump's India Visit : कौन है वो?... ट्रम्प-मोदी-मेलानिया यांच्यासोबत रेड कार्पेटवर चालणाऱ्या 'ती'ची गोष्ट

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या विमानात 'हा' आहे फरक

Donald Trump India Visit Live : Donald Trump: चहावाला ते पंतप्रधान... चक्क भाषण थांबवून मोदींजवळ गेले ट्रम्प!

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्यासाठी 'ढोकळा', तर मोदींसाठी 'स्पेशल चहा', महामेजवानीमध्ये असणार 'हे' खास पदार्थ

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसDeathमृत्यू