लखनऊ: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लखनऊमधल्या घंटाघर परिसरात आंदोलन सुरू आहे. या भागात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. डिफेन्स एक्प्सोमुळे कलम १४४ लागू करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. आंदोलनकर्त्यांकडील खाद्यपदार्थ, त्यांची अंथरुणं पोलिसांनी जप्त केली आहेत. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लखनऊमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात महिलांचं शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. या महिलांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी बळाचा वापर सुरू असल्याचं काही व्हिडीओंमधून दिसत आहे. अनेक महिलांसोबत त्यांची लहान मुलंदेखील आंदोलनात सहभागी झाली आहेत. त्यांना हटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
CAA Protest: हे तर चोर! अंथरुणं जप्त करणाऱ्या पोलिसांविरोधात महिला आंदोलकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 3:35 PM