CAA राज्यांना लागू करावच लागेल; सिब्बल यांच्या पाठोपाठ खुर्शीद यांचा पुनरुच्चार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:54 PM2020-01-20T12:54:31+5:302020-01-20T13:52:14+5:30
आता सिब्बल यांच्यानंतर खुर्शीद यांनीही हेच मत मांडले आहे. तर विविध राज्यातील काँग्रेस नेते CAA लागू न करण्यावर ठाम आहे. मात्र सिब्बल आणि खुर्शीद यांनी दावा केल्याप्रमाणे खरं असेल तर देशात सर्व राज्यात CAA लागू होईल अशी शक्यता आहे.
नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायदा अर्थात CAA कायद्यावरून काँग्रेसमध्येच संभ्रम दिसून येत आहे. विविध राज्यातील काँग्रेस नेते CAA लागू होऊ देणार नसल्याचे सांगत असताना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते वेगळीच भूमिका मांडताना दिसत आहेत. काँग्रेस नेते कपील सिब्बल यांच्या पाठोपाठ आता सलमान खुर्शीद यांनी देखील राज्यांना CAA कायदा लागू करावाच लागले, असं म्हटले आहे.
CAA वरून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र पक्षातील नेतेच CAA लागू करण्यावरून वेगळी भूमिका मांडत आहेत. आधी सिब्बल यांनी CAA लागू करण्यावरून आपले मत मांडले होते. आता खुर्शीद यांनीही त्याचच पुनरुच्चार केला आहे. संवैधानिक पातळीवर CAA राज्यात लागू करण्यास कोणतेही राज्य नकार देऊ शकत नाही, असं त्यांनी नमूद केले.
पश्चिम बंगाल, केरळ आणि पंजाबसारख्या राज्यांनी हा कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. परंतु नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी कोणतंही राज्य नकार देऊ शकत नाही, असं विधान काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलं आहे. कोणत्याही राज्यानं या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दिल्यास ते असंवैधानिक ठरेल, असंही सिब्बल यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी हे विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आता सिब्बल यांच्यानंतर खुर्शीद यांनीही हेच मत मांडले आहे. तर विविध राज्यातील काँग्रेस नेते CAA लागू न करण्यावर ठाम आहे. मात्र सिब्बल आणि खुर्शीद यांनी दावा केल्याप्रमाणे खरं असेल तर देशात सर्व राज्यात CAA लागू होईल अशी शक्यता आहे.