शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

"मी गॅरंटी देतोय, येत्या 7 दिवसांत CAA लागू होईल", केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 8:44 AM

दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत शंतनू ठाकूर बोलत होते.

कोलकाता : येत्या एका आठवड्यात देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू होईल, असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. ते म्हणाले की, "मी मंचावरून गॅरंटी देत ​​आहे की, येत्या सात दिवसांत केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए लागू होईल." दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत  शंतनू ठाकूर बोलत होते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उल्लेख 'देशाचा कायदा' असा केला होता आणि म्हटले होते की, या कायद्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सीएएबद्दल लोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही अमित शाह यांनी केला होता.

अमित शाह म्हणाले होते, "कधीकधी त्या (ममता बॅनर्जी) देशात सीएएस लागू होईल की नाही, याबद्दल लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. यावर मी स्पष्ट करू इच्छितो की सीएए हा देशाचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही आमच्या पक्षाची वचनबद्धता आहे." दरम्यान, अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे, असा आरोप केला होता.

ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, "पूर्वी, नागरिकत्व कार्ड ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी होती, पण आता ती केवळ राजकारणासाठी हिसकावून घेतली गेली आहे. त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. त्यांना ते (नागरिकत्व) काहींना द्यायचे आहे आणि इतरांना ते नाकारायचे आहे. जर एकाला (समुदायाला) नागरिकत्व मिळत असेल तर दुसऱ्याला (समुदायाला) ही ते मिळायला हवे. हा भेदभाव चुकीचा आहे."

2019 मध्ये मंजूर झाला होता कायदा!दरम्यान, या कायद्यानुसार, 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या गैर-मुस्लिम (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. सीएए डिसेंबर 2019 मध्ये संसदेने मंजूर केला होता. कायदा मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाAmit Shahअमित शाहMamata Banerjeeममता बॅनर्जीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक