नवी दिल्ली : मोदी सरकारने केंद्र सरकारीकर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक खूशखबर दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सात टक्के महागाई भत्ता मिळतो. मात्र आता त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्यामुळे 9 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधी मार्चमध्ये 2 टक्क्यांनी वाढ दिली होती. 1 जानेवारीपासून ती लागू करण्यात आली होती. सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एक जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत तर 61 लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारक मंडळी आहेत.