शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

मंत्रिमंडळ--हेडलाईन

By admin | Published: July 03, 2015 11:00 PM

उच्च पदांसाठी कोकणीची सक्ती नको

उच्च पदांसाठी कोकणीची सक्ती नको
मंत्रिमंडळाचा निर्णय :
पणजी : व्यावसायिक महाविद्यालयांतील विविध पदे, आरोग्य सेवा क्षेत्रातील सल्लागार पदे आणि उच्च अशा तांत्रिक व शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या पदांसाठी यापुढे कोकणी भाषेच्या ज्ञानाची सक्ती नसेल. या पदांसाठी उमेदवार मिळत नसल्याने कोकणीची अट शिथिल करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या सर्व पदांसाठी उमेदवार भरती गोवा लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. अनेक वेळा या पदांसाठी गोमंतकीय उमेदवार सापडत नाहीत. त्यामुळे पदे रिक्त राहतात. कोकणी भाषेच्या ज्ञानाची सक्ती असल्याने परप्रांतांमधील व्यक्तींनाही या पदांसाठी नोकरीवर घेता येत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयी चर्चा झाली व कोकणीचे ज्ञान असलेला उमेदवार जेव्हा उपरोल्लेखित पदांसाठी मिळत नसेल, तेव्हा कोकणी सक्तीची अट शिथिल करावी, अशी सूचना आयोगास करावी, असे ठरविण्यात आले. त्यासाठी सरकारने यापूर्वीच्या काही अधिसूचनांचाही आधार घेतला आहे.

तुरुंगातील विषबाधेची चौकशी
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्वरी येथील सचिवालयात ही बैठक झाली. यावेळी अन्यही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आग्वाद येथील तुरुंगात व म्हापसा येथील न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना २०१३ साली विषबाधा झाली होती. एका कैद्याचा त्यावेळी मृत्यूही झाला होता. अनेक कैदी आजारी पडले होते. त्यावेळी सरकारने अंतर्गत चौकशी करून घेतली होती. तथापि, मानवी हक्क आयोगाकडे हा विषय गेल्यानंतर आयोगाने न्यायाधीशांमार्फत या कथित विषबाधेची चौकशी केली जावी, अशी शिफारस केली. सरकारने ही शिफारस मान्य केली. आता विषबाधेच्या चौकशीसाठी उत्तर गोव्याच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांचा एक सदस्यीय आयोग नेमावा, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. साठ दिवसांत याबाबतचा अहवाल सरकारने अपेक्षित धरला आहे.

दिवाणी न्यायाधीशांच्या एकूण दहा जागा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. तथापि, तीन न्यायाधीशांच्या जागा मंत्रिमंडळाच्या शुक्रवारच्या बैठकीवेळी निर्माण करण्यात आल्या. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळातील विविध विभागांतील सुमारे ४० कंत्राटी कर्मचार्‍यांना एक वर्षाची सेवावाढ देणे, हस्तकारागिर व काथ्याकाम खात्यात नवी आठ पदे निर्माण करणे, वीज खात्यात तीन कनिष्ठ वीज अभियंत्यांची पदे निर्माण करणे आदी निर्णय मंत्रिमंडळाने घेतले. (खास प्रतिनिधी)