हरिश गुप्तानवी दिल्ली : केंद्रातील सहा मंत्र्यांनी गुरुवारी संध्याकाळी राजीनामे दिले असल्याची चर्चा असून, केंद्रीय मंत्रिमंडळात शनिवारी फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री आणि भाजपाचे बिहारचे नेते राजीव प्रताप रूडी, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारतीतसेच आरोग्य राज्यमंत्री फागनसिंह कुलस्ते यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच संजीव बलियान, कलराज मिश्रा, महेंद्र पंड्या या मंत्र्यांनीही राजीनामा दिल्याचे कळते. सूत्रांनुसार, मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचे कळते. त्यानुसार आज अनेक मंत्री अमित शहा यांना भेटले.विस्तार सध्या नाही?नितीश कुमार यांच्या जदयूच्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार आहे. तसेच अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. मात्र अण्णा द्रमुकने यासाठी काहीसा वेळ मागितला असून, त्यामुळे सध्या केवळ मंत्रिमंडळ फेरबदल केला जाऊ शकतो. पंतप्रधान मोदी चीन दौºयावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात शनिवारी फेरबदल? 6 मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:28 AM