चेन्नई : वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. तामिळनाडूच्या अरक्कोनममध्ये वंदे भारतला एक वासरू धडकले असून, या घटनेत वासराचा मृत्यू झाला. या अपघाताच्या एक आठवडा आधी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी दक्षिणेतील पहिल्या ‘वंदे भारत’ ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
मालक जाणार तुरुंगात?दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागाचे जनसंपर्क अधिकारी एलुमलाई यांनी सांगितले की, रेल्वे वासराच्या मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा विचार करत आहे. अशा प्राण्यांच्या मालकांना कलम १५४ अंतर्गत शिक्षा होऊ शकते. यात एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये अपघाताच्या घटना घडल्या आहेत, तेथे पुढील सहा महिन्यांत १,००० किमीची भिंत बांधण्यात येईल.