बंगळुरू: बंगळुरूपासून ३० किमी आग्नेयेस असलेल्या बाणेरगट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये (बीबीपी) पिंज-याची सफाई करण्यासाठी गेलेल्या अंजनेय उर्फ अंजनी या ४० वर्षांच्या कामगारास पांढ-या वाघाच्या दोन बछड्यांनी हल्ला करून ठार केले.या प्राणिसंग्रहालयात एक सफारी विभाग आहे व तेथे बंद वाहनांतून फेरफटका मारताना लोकांना वन्यजीव पाहता येतात. सफारीच्या वेळी वाघांसह अन्य जीव पिंजºयाबाहेरच्या मोकळ््या जागेत फिरत असतात. सफारीची वेळ संपली की, त्यांना पुन्हा पिंजºयात नेले जाते.या सफारी विभागातील एका पिंजºयात स्थानिक आमदार अशोक खेनी यांनी दत्तक घेतलेला सूर्या हा पांढरा वाघ व वन्या आणि झाशी राणी हे त्याचे दोन बछडे असतात. हे दोन्ही बछडे दीड वर्षाचे आहेत. सफरीची वेळ संपली की, हिंस्र श्वापदांना त्यांच्या पिंजºयात खाण्यासाठी मांस दिले जाते. शनिवारी सायंकाळी या पांढºया वाघांच्या पिंजºयातही मांस टाकले गेले. नंतर पिंजºयाची सफाई करण्यासाठी ‘गेटमन’ म्हणून काम करणारा नेहमीचा कर्मचारी उपलब्ध नव्हता, म्हणून वरिष्ठांनी चारच दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकाचे काम सोडून प्राण्यांच्या पिंजºयाचे काम करू लागलेल्या अंजनीला या पांढºया वाघांच्या पिंजºयांची सफाई करण्यास सांगितले.पिंजºयाचे दोन भाग असतात व त्यामध्ये दरवाजा असतो. वाघांना एका भागात घेऊन दुसºया भागाची सफाई केली जाते. अंजनी नवीन असल्याने, तो वाघांना पिंजºयाच्या दुसºया भागात पाठवून, मधला दरवाजा बंद न करताच पिंजºयात शिरला.पिंजºयात अचानकपणे अनोळखी व्यक्ती आलेली दिसताच, वाघाच्या एका बछड्याने अंजनीवर झेप घेतली व त्याच्या नरडीचा घोट घेतला. लगोलग दुसरा बछडाही त्याच्यावर तुटून पडला. अंजनीने जीव वाचविण्यासाठी आरडा-ओरड सुरू केल्यावर, मोठा सूर्या वाघही उठून आला व तिघांनी मिळून अंजनीला फरफटत पिंजºयाबाहेरच्या बंदिस्त मोकळ््या जागेत आणले. इतर कर्मचा-यांनी वाघांना नियंत्रित करून पुन्हा पिंजºयात बंद करेपर्यंत अंजनी गतप्राण झाला होता. नंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी व्हिक्टोरिया इस्पितळात पाठविण्यात आला. अंजनी हक्की पिक्की झोपडपट्टीत राहायचा. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. या संदर्भात ‘बीबीपी’च्या अधिकाºयांविरुद्ध बाणेरगट्टा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
बछड्यांनी सफाई कामगारास ठार केले,पिंजरा साफ करताना केला हल्ला; कर्नाटकातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:12 AM