शीलेश शर्मा।नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली असली तरी सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष थांबताना दिसत नाही. न्यायाधीशांतील मतभेद वाढत असून, ते शीतयुद्धासारखे लढले जात आहे. न्या. रंजन गोगोई व न्या. मदन लोकूर यांनी न्या. मिश्रा यांना पत्र लिहून न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची बैठक बोलावण्याची मागणी केली.भविष्यावर चर्चा होणे आवश्यकपत्रात ते म्हणाले की, संस्थात्मक मुद्यांवर व सर्वोच्च न्यायालयाच्या भविष्यावर चर्चा आवश्यक आहे. काहींच्या मते सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र हे त्यांच्यावर दडपण आणण्याचा तसेच सर्वोच्च न्यायालयाला सरकारच्या हस्तक्षेपापासून दूर नेण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.
पूर्ण न्यायालय बोलवा, दोन न्यायमूर्तींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:39 IST