ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही. मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर उपरोधिक टीका केली. राजधानी दिल्लीतील दुस-या 'रायसिना डायलॉग'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी अनेक देशांतील 250 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात. त्यांना आम्ही एकाकी पाडले असून दहशतवादाला सळो की पळो केलं आहे. तसेच, जगातील संपूर्ण दहशतवादाचा नायनाट करण्यात येईल. ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी यावेळी अनेक मुद्दावर भाष्य केले.
A thriving well integrated neighbourhood is my dream: PM Modi at the second Raisina Dialogue in Delhi pic.twitter.com/slAxSy3PJJ— ANI (@ANI_news) 17 January 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही मुद्दे -
- ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत.
- जे लोक हिंसा, तिरस्कार आणि दहशतवाद्यांना खतपाणी घालतात, त्यांना आम्ही एकाकी पाडले.
- आम्ही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्याशी सुद्धा विकासासाठी सहकार्य करण्यावर चर्चा केली.
- युरोपसोबत आम्ही भारताच्या विकासाठी समझोता केला, तसेच आम्ही स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मदत केली.
- पंतप्रधान पदाची शपथ घेताना पाकिस्तानसोबत सार्कच्या सर्व देशांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
- मला शेजारील राष्ट्रांशी संबंध चांगले पाहिजे.
- मी लाहोरला सुद्धा गेलो होतो, परंतु शांततेच्या मार्गावर एकटे जाता येत नाही.
- भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील झालेले मजबूत संबंध एक उदाहरण आहे.
- गेल्या अडीच वर्षात आम्ही शांततेसाठी काम केलं, अफगाणिस्तानमध्ये याचं उदाहरण पाहता येईल.
- सबका साथ, सबका विकास... फक्त भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगाला आहे.
- फक्त आपाल्या फायद्यासाठी बोलणे, ही आपली संस्कृती नाही.
- ग्लोबलायझेशन सोबत अनेक आव्हाने सुद्धा आहेत.
- वेगवेगळ्या पद्धतीने जगभरात मोठ्याप्रमाणात बदल होत आहेत.
- 2014 मध्ये बदल हवा होता म्हणून लोकांनी भाजपला सरकार बनविण्याची संधी दिली.
Its a great privilege to speak to you at the inauguration of second edition of the Raisina Dialogue: PM Modi in Delhi pic.twitter.com/E82RV7RC6W— ANI (@ANI_news) 17 January 2017
PM Modi speaking at the inauguration of the second Raisina Dialogue, in Delhi pic.twitter.com/0mIPwvLgKB— ANI (@ANI_news) 17 January 2017