नवी दिल्ली- देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते. लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तसे राम मंदिरचा मुद्द्या तापत चालला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेनंही पत्रकार परिषद घेतली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, राम मंदिरासाठी गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू समाज आग्रही आहे. ही लोकशाहीची लढाई आहे. संताचा समाज आणि जनता आमच्यासोबत आहे. आम्ही राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. सरकारनं लवकरात लवकर कायदा तयार करावा.प्रयागराजच्या कुंभमेळ्यात 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला संत समाज एकत्र येऊन धर्म संसदेत मंदिराच्या मुद्द्यावरील रणनीतीचा निर्णय घेईल. मंदिर मुद्दा हा काँग्रेसनं लटकवल्याचाही आरोप विहिंपनं केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यारून सर्व खासदारांची भेट घेत आहोत. परंतु अद्यापही वाराणसीचे खासदार पंतप्रधान मोदी यांची भेट होऊ शकलेली नाही.तत्पूर्वी एएनआयच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, 70 वर्षं देशात राज्य करणाऱ्या काँग्रेसनं राम मंदिराचा मुद्दा लटकवला आहे. काँग्रेसचे वकील सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराच्या मुद्द्यावरून अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे राम मंदिरचा मुद्दा लटकला आहे. सध्या राम मंदिर हा मुद्दा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे, त्यातून बाहेर आल्यानंतर त्यावर योग्य निर्णय घेऊ, असंही मोदींनी काल सांगितलं होतं. तर शिवसेनेसह इतर पक्षांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 4:07 PM