नवी दिल्ली - आधार कार्डच्या वापरावरुन नेहमीच अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातच, सरकारने आधार सक्तीचे केल्यानंतर आधारच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उद्भवले आहेत. त्यापैकी, जर माझ्या आधार कार्डचा नंबर माहित असल्यास कुणी माझ्या बँक अकाऊंटमधून पैस तर काढणार नाही ना ? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडला आहे. त्यावर, तसे शक्य नसल्याचे युआयडीएआयने उत्तर दिले आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. युएडीएआयच्या डेटाबेसमध्ये केवळ न्यूनतम माहिती असते. आधारसाठी नामांकन करताना किंवा अपटेड माहिती देताना जी माहिती तुम्ही देता केवळ तोच डेटा युएडीएआयकडे असतो. दोन्ही डोळ्यांचे स्कॅन, चेहऱ्याचा फोटो, मोबाईल नंबर आणि ई-मेल यांचाच त्यामध्ये समावेश असतो. त्यामुळे, युएडीएआयकडे तुमच्या बँक अकाऊंट, शेअर्स, म्युच्युअल फंड, फायनेंशियल, आरोग्य स्थिती, कुटुंबाची माहिती, धर्म, जाती किंवा इतर कुठलाही माहिती नसल्याचे युएडीआयएने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आधार अधिनियम 2016 च्या कलम 32(3) अन्वये कुठलिही सत्य माहितीला नियंत्रित, एकत्रित, अनुरक्षित करणे किंवा सार्वजनिक करणे हे युएआयएडी आणि इतर संस्थांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.